लोकसभा सेमीफायनल: छत्तीसगड-राजस्थानमध्ये काँग्रेसने मारली मुसंडी, मध्यप्रदेशात मामाजींना फोडला घाम

Foto

लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिल्या जात असलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या भाजप शासित राज्यांपैकी छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसने मुसंडी मारली आहे. मध्यप्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर सुरु आहे. अंतिम निकाल आल्यानंतरच येथील चित्र स्पष्ट होईल. दुसरीकडे, तेलंगणा आणि मिझोराम या छोट्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय पक्षांना सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळवले आहे.

राजस्थानही काँग्रेसने वसुंधरा राजे यांच्या साम्राज्याला जोरदार धक्का दिला आहे. येथे काँग्रेसने भाजपच्या हातून सत्ता हिसकावून घेतल्याचे चित्र रात्री ९ पर्यंत आलेल्या कौलमधून दिसत आहे. १९९ पैकी ९९ जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे, तर भाजपला ०७३ जागांवर आघाडीवर आहे.

छत्तीसगमध्ये काँग्रेसने भाजपच्या रमनसिंग सरकारचा दारुन पराभव केला आहे. काँग्रेसने निम्म्यापेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. येथे काँग्रेस निर्विवादपणे सरकार स्थापन करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अजित जोगी आणि बसपा आघाडीला जनतेने नाकारले आहे. छत्तीसगडमध्ये सत्ताविरोधी लाट स्पष्ट जाणवली आहे.

तेलंगणामध्ये टीआरएस आघाडीवर आहे. या प्रादेशिक पक्षाला ना काँग्रेस धक्का लावू शकली ना भाजपचा करिष्मा येथे चालला. एआयएमआयएमचे फायर ब्रँड नेते अकबरुद्दीन ओवेसी येथून विजयी झाले आहे. मिझोरामध्ये एमएनएफ आघाडीवर आहे. येथे काँग्रेसचा धुव्वा उडाला आहे.

मध्यप्रदेशमध्ये सत्ताविरोधी लाट जाणवलेली नाही. येथे सकाळपासून काँग्रेस आणि भाजप यांच्यात काट्याची टक्कर सुरु आहे. कधी काँग्रेस पुढे तर कधी भाजप आघाडी घेताना दिसत आहे.  २३० जागांच्या विधानसभेत ११६ हा जादुई आकडा ज्यांच्याकडे असेल ते सरकार स्थापन करणार आहे. या जादुई आकड्यापासून काँग्रेस आणि भाजप दोघेही दूर आहेत. येथे मायावतींचा बहुजन समाज पक्ष किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. त्यांना ५ जागांवर आघाडी आहे.

मोदींचे विधानसभा निकालावर मौन

लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. संसदेच्या आवारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतर पत्रकारांनी त्यांना पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया विचारण्याचा प्रयत्न केला. नरेंद्र मोदींनी यावर मौन पाळणे पसंत केले आहे. 

मध्यप्रदेश (२३०/२३०)

बहुमत- ११६       

काँग्रेस –       ११३                              

भाजप –       ११०                   

बसपा –       ०२

इतप-         ५


राजस्थान (१९९)

बहुमत- १००                 

काँग्रेस –           ०९९     

भाजप –           ०७३

बसपा –           ०६

अपक्ष-           ०११

इतर -           ०८


तेलंगणा (११९/११९)

बहुमत- ६०          

टीआरएस -    ०८८

काँग्रेस –      ०१९      

भाजप –      ००१ 

इतर -                 ०९


छत्तीसगड     (९०/९०)

बहुमत- ४६

काँग्रेस –      ०६८    

भाजप –      ०१६

बसपा + –     ००२

इतर -        ००४


मिझोराम  (४०/४०)

बहुमत- २१

एमएनएफ -  २६

काँग्रेस –     ००५

भाजप-      ००१
अपक्ष-      ००८